Muhammad Shafi’i Ansari

Ayah by Ayah

Tags

Download Links

A translation of every ayah of the Quran in Marathi.

Muhammad Shafi’i Ansari translation for Surah Az-Zumar — Ayah 29

39:29
ضَرَبَ ٱللَّهُ مَثَلٗا رَّجُلٗا فِيهِ شُرَكَآءُ مُتَشَٰكِسُونَ وَرَجُلٗا سَلَمٗا لِّرَجُلٍ هَلۡ يَسۡتَوِيَانِ مَثَلًاۚ ٱلۡحَمۡدُ لِلَّهِۚ بَلۡ أَكۡثَرُهُمۡ لَا يَعۡلَمُونَ ٢٩
अल्लाह एक उदाहरण निवेदन करीत आहे की एक असा मनुष्य, ज्यात अनेक आपसात भिन्नता राखणारे भागीदार आहेत आणि दुसरा तो मनुष्य, जो फक्त एकाचाच दास आहे. काय हे दोघे गुणवैशिष्ट्यात एकसमान आहेत?1 सर्व प्रशंसा अल्लाहकरिता आहे. वास्तविक, त्यांच्यापैकी अधिकांश लोक जाणत नाहीत.
Footnotes
  • [1] (१) यात अनेकेश्वरवादी आणि एकेश्वरवादीचे उदाहरण दिले गेले आहे. अर्थात असा एक गुलाम, जो अनेक मालकांचा दास आहे, जे आपसात भांडत असतात आणि एक दुसरा गुलाम, ज्याचा केवळ एकच मालक आहे. त्याच्या मिळकतीत त्याचा कोणीही भागीदार नाही, तर काय हे दोन्ही गुलाम समान ठरू शकतात? नाही, कदापि नाही. त्याचप्रमाणे तो अनेकेश्वरवादी जो अल्लाहसोबत इतर उपास्यांचीही उपासना करतो आणि दुसरा निखालस ईमान राखणारा जो फक्त अल्लाहची उपासना करतो व त्याच्यासोबत कोणालाही सहभागी बनवित नाही, दोघे समान ठरू शकत नाही.